नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फाटलेल्या पिशव्या शिवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्सला ब्लेड मारून चोरट्यांनी दागिणे लांबविले. ही घटना गोदाघाटावरील सांडवा देवी मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताराबाई अशोक हुगाडे (६५ रा.शेजवळ वाडा,काळााराम मंदिर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हुगाडे शुक्रवारी (दि.२) दुपारी घरातील फाटक्या पिशव्या शिवण्यासाठी गोदाघाटावर गेल्या होत्या. सांडवा देवी मंदिर परिसरातील दुकानावर त्या पिशव्या देत असतांना ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधून त्यांच्या हातातील पर्सला ब्लेड मारून पर्समधील सोन्याच्या वाट्या,मणी व चांदीचे ब्रेसलेट असा सुमारे १३ हजार ६०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.