इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे येथे संकल्प मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावून बघितले तर याच पुण्यावर शाहिस्तेखान चाल करुन आला होता. मात्र तो हुशार होता. त्याचं बोटावर निभावलं. तो पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. तसा शहाणपण जर काही लोकांनी घेतला असता तर ते देखील परत कधीच आले नसते. मात्र ते पुन्हा आले ते का आलेत तर गेल्या लोकसभा निवडणुकीत जे फटके महाराष्ट्राच्या जनतेने दिले त्याचे वळ कुठे कुठे पडले आहेत याची चाचपणी करण्यासाठी आले होते. ही परत आलेली व्यक्ती म्हणजे अहमद शाह याचा राजकीय वंशच अमित शहा हे होय. तो देखील शाहाच होता, हे देखील शाहच आहेत.
यावेळी ते पुढे म्हणाले की, आम्हाला हिंदुत्व शिकवता. तुम्ही नवाज शरीफची केक खाणारी औलाद तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं.
तुम्ही विश्वासघात केला. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही, असे शंकराचार्य म्हणाले. तुम्ही काय करता. तुमचे पूर्वज काढा, १९४० पासून. श्यामाप्रसाद मुखर्जी, तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली. त्यांच्यासोबत मांडीला मांडू लावून बंगालमध्ये सत्ता स्थापन करणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार केले. चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे,. नितीश कुमार हा काय हिंदुत्ववादी आहे. त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते. आणि आम्हाला हिंदुत्वाचे विचारता. तुमचं काय आहे ते सांगा? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला.
या मेळाव्यात त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका केली. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारवरही ताशेरे ओढले.