१- महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर जिल्ह्यात आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार ९ पर्यंत ढगाळ वातावरणाचीच शक्यता अधिक असून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
विदर्भ मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रात मात्र पहाटेचा गारवा कमी होवून दुपारचे कमाल तापमान काहीसे अधिक राहण्याची शक्यता जाणवते. तेथे पावसाची शक्यता नाही.
२- दरम्यानच्या पाच दिवसाच्या कालावधीत अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याची स्थितीतून कमी दाब क्षेत्राची निर्मिती होवु शकते. परंतु त्यापासून महाराष्ट्रात साधारण २० नोव्हेंबर पर्यन्त कोणत्याही पावसाची शक्यता जाणवत नाही. शुक्रवार दि.१० नोव्हेंबर पासून पुन्हा हळूहळू पहाटेच्या गारव्यात वाढ होवून दुपारचे कमाल तापमानही सामान्य राहण्याची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.