नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कसारा रेल्वे घाटात दरड कोसळल्याने मुबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली असून मुबई कडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या मिडल लाईनने काढण्यात येत आहेत.
कसारा घाटातील घाटनदेवी मंदिराच्या खालच्या बाजूला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे लाईन वर दगड गोटे व मातीचा भराव आल्याने मुंबईकडे जाणारा मार्ग हा बंद झाले आहे. तत्पूरते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस हे मिडल लाईन वरून चालवल्या जात आहे.