इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाचा श्रीलंके विरुध्दचा पहिलाच एकदिवसीय सामना हा टाय झाला आहे. श्रीलंकेने विजयासाठी २३१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ४७.५ टीम इंडियाला ऑलआऊट २३० धावाच केल्या. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला.
या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक ५८ धावा केल्या. तर शुबमन गिल १६, विराट कोहली २४, वॉशिंग्टन सुंदर ५, श्रेयस अय्यर २३, केएल राहुल ३१, अक्षर पटेल ३३, शिवम दुबे २५, कुलदीप यादवने २ आणि मोहम्मद सिराज याने नाबाद ५ धावा केल्या. तर अर्शदीप सिंह एलबीडबल्यू झाला. त्यानंतर भारताचा डाव २३० धावावरच संपला.
या सामन्यात भारतीय संघ जवळपास विजयाजवळ असतांना श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असालंका याने हा सामना फिरवला आणि बरोबरीत सोडवला. टीम इंडियाला विजयासाठी १४ बॉलमध्ये फक्त १ धावेची गरज होती. तेव्हा चरिथने ४८ व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर शिवम दुबे याला आऊट केले. त्यावेळेस ही नववी विकेट होती. त्यानंतर अर्शदीप सिंह मैदानात आला. त्यावेळेस भारतीय संघाला १४ बॉलमध्ये १ रन हवे असताना अर्शदीप मोठा फटका मारण्याचा नादात एलबीडब्ल्यू झाला.