नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गणेशवाडीतील विष्णूनगर भागात पोलीसांनी छापा टाकत जुगार अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत अकरा जुगारी पोलीसांच्या हाती लागले असून त्यांच्या ताब्यातून २३ हजाराची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या ठिकाणी पत्याच्या कॅटवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळला व खेळविला जात होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नयन परशराम गांगुर्डे, योगेश रामू गिते,रितेश सुनिल साळवे,रोहित सुभाष पाटील,ओमकार सुर्यकांत रावळ,लहानू मार्तंड गरड,सतिष लक्ष्मण वाघ, भुषण शिवाजी कारवाळ,ज्ञानेश्वर उर्फ सागर दिनकर वाघमारे,नितीन अशोक जोशी व किशोर गणपत हलकंदर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत.
विष्णूनगर येथील दाते यांच्या प्लॉटमधील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पंचवटी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.१) पोलीसांनी धाव घेत छापा टाकला असता संशयित पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून २२ हजार ९५० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याबाबत हवालदार विशाल खाजेकर यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास जमादार वणवे करीत आहेत.