इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांना हृदविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्कार एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. त्यांना मुंबई येथी रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.
दुपारी त्यांच्या छातीत दुखत होते. त्यानंतर त्यांना स्थानिक हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. आता त्यांची प्रकृती ठिक असून त्यांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी यंत्रणनेला याबाबत सुचना दिल्या. त्यानंतर एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली.