मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्रिमंडळाने ८ महत्त्वाच्या राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना दिली मंजुरी…पुणे आणि नाशिक दरम्यान उड्डाणपूल कॉरिडॉरचाही समावेश

by India Darpan
ऑगस्ट 2, 2024 | 11:01 pm
in मुख्य बातमी
0
modi 111

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने देशभरात 50,655 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांच्या विकासाला मंजुरी दिली आहे. या 8 प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे सुमारे 4.42 कोटी मनुष्यदिवस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.

प्रकल्पांबाबत संक्षिप्त माहिती :

  1. 6-पदरी आग्रा – ग्वाल्हेर राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर:
    88-किमीचा हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित 6-पदरी कॉरिडॉर म्हणून विकसित केला जाईल आणि यासाठी 4,613 कोटी रुपये एकूण भांडवली खर्च येईल.
  2. 4-पदरी खरगपूर – मोरेग्राम राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर:
    खरगपूर आणि मोरेग्राम दरम्यान 231-किमीचा 4-पदरी प्रवेश-नियंत्रित हाय-स्पीड कॉरिडॉर हा हायब्रीड ॲन्युइटी मोड वर विकसित केला जाईल. याचा एकूण भांडवली खर्च 10,247 कोटी रुपये आहे.
  3. 6-पदरी थरड – दिसा – मेहसाणा – अहमदाबाद राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर:
    214-किमीचा 6-पदरी हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा – वापरा – हस्तांतरित करा तत्वावर 10,534 कोटी रुपये एकूण भांडवली खर्चासह विकसित केला जाईल. 10,534 कोटी.
  4. 4-पदरी अयोध्या रिंग रोड:
    68-किमीचा 4-पदरी प्रवेश-नियंत्रित अयोध्या रिंगरोड हा हायब्रीड ॲन्युइटी मोड मध्ये 3,935 कोटी रुपये एकूण भांडवली खर्चासह विकसित केला जाईल. .
  5. रायपूर-रांची राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉरचा पथलगाव आणि गुमला दरम्यान 4-पदरी खंड :
    रायपूर – रांची कॉरिडॉरचा 137-किमीचा 4-पदरी प्रवेश-नियंत्रित पथलगाव – गुमला खंड हायब्रीड ॲन्युइटी मोड मध्ये विकसित केला जाईल. संपूर्ण कॉरिडॉर पूर्ण करण्यासाठी 4,473 कोटी रुपये एकूण भांडवली खर्च येईल.
  6. 6-पदरी कानपूर रिंग रोड:
    कानपूर रिंगरोडचा 47-किमीचा 6-पदरी प्रवेश-नियंत्रितखंड अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम पद्धतीने एकूण. 3,298 कोटी रुपये भांडवली खर्चासह विकसित केला जाईल.
  7. 4- पदरी उत्तर गुवाहाटी बायपास आणि विद्यमान गुवाहाटी बायपासचे रुंदीकरण/सुधारणा:
    121-किमीचा गुवाहाटी रिंगरोड बांधा, वापरा, टोल (बीओटी) मोडमध्ये विकसित केला जाईल. यासाठी एकूण भांडवली खर्च 5,729 कोटी रुपये येईल.
  8. पुण्याजवळ 8-पदरी उन्नत नाशिक फाटा – खेड कॉरिडॉर:
    पुण्याजवळ नाशिक फाटा ते खेड दरम्यान 30-किमीचा 8-पदरी उन्नत राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा-वापरा -हस्तांतरित करा तत्वावर विकसित केला जाईल. यासाठी 7,827 कोटी रुपये भांडवली खर्च येईल. उन्नत कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानच्या NH-60 वरील चाकण, भोसरी इत्यादी औद्योगिक केंद्रांवरून जाणाऱ्या /येणाऱ्या वाहतुकीसाठी वेगवान हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या कॉरिडॉरमुळे पिंपरी-चिंचवडमधील मोठी वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

नाशिक फाटा ते खेड कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंच्या 2 पदरी सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे 4/6 पदरी रस्त्यात रूपांतर करण्यासह सिंगल पिलरवर टियर – 1 वर 8 पदरी उन्नत उड्डाणपूल महाराष्ट्र राज्यातील NH-60 च्या खंड (Pkg-1: from km 12.190 to km 28.925 & Pkg-2: from km 28.925 to km 42.113) वर बांधण्यात येईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली राहील, जाणून घ्या, शनिवार, ३ ऑगस्टचे राशिभविष्य

Next Post

केंद्रीय आरोग्य विभागाची उच्चस्तरीय बैठक…९ राज्यांतील डेंग्यू स्थितीबात घेतले हे निर्णय

India Darpan

Next Post
IMG 20240729 WA0177 1

केंद्रीय आरोग्य विभागाची उच्चस्तरीय बैठक…९ राज्यांतील डेंग्यू स्थितीबात घेतले हे निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011