नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजना व केंद्रीय मार्ग निधी (CIRF) अंतर्गत २०२३-२४ मध्ये कळवण तालुक्यातील नांदुरी येथील सप्तश्रृंगी गड रस्ता व नांदुरी बसस्थानकाच्या कामांचे भूमीपुजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक पगार, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पाटील, उपकार्यकारी अभियंता रोहीणी वसावे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*या कामांचे झाले भूमिपुजन…
- तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजने अंतर्गत सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा – कनाशी – मानुर आलियाबाद रस्ता राज्य मार्ग-२१ कि.मी.०/०० ते १८/०० मध्ये दरडप्रतिबंधक उपाययोजना करणे (कामाची किंमत रुपये ३५००.०० लक्ष)
- केंद्रीय मार्ग निधी (CIRF) अंतर्गत सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा – कनाशी – मानुर आलियाबाद रस्ता रामा-२१ कि.मी.०/०० ते १०/०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे (कामाची किंमत रुपये ५०५०.०० लक्ष)
- तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजने अंतर्गत नांदुरी येथे महाराष्ट्र राज्यपरिवहन महामंडळसाठी बसस्थानकाचे बांधकाम करणे (कामाची किंमत रुपये 550.00 लक्ष)
बसस्थानकातील सुविधा : मौजे सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सव व चैत्रोत्सवात येणाऱ्या भाविकांची येण्या-जाण्याची सोय व्हावी म्हणून तळ मजला -५१७.६५ चौ.मी. व पहिला मजला -४५३.६२ चौ.मी. तसेच पाच प्लॅटफॉर्म अशा स्वरूपाचे बस स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रशासनास यात्रोत्सव काळात वाहतुक नियोजन करणे.
- प्रवाशांच्या सोयीसाठी मोठे आणि सुटसुटीत प्लॅटफॉर्म, बस आणि अन्य वाहनांसाठी विशेष पार्किंग सुविधा
- वाहक व चालक यांच्यासाठी विश्रामगृह.
- प्रवाशांसाठी बस स्थानकात आधुनिक व स्वच्छ सुविधा : बसण्यासाठी आरामदायक खुर्चा, स्वच्छतागृहे, वॉटर कूलर आणि उष्णता संवेदनशील साधने.
- तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजने अंतर्गत मौजे नांदुरी (सप्तश्रृंगी गड) येथे भक्त निवास बांधकाम करणे (कामाची किंमत रुपये 851.02 लक्ष)