नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात व बाकी राहिलेली बिले वाढवून देण्याचे काम करून देण्याकरीता कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने दोन हजार रुपयाची लाच घेतांना धुळे पोलिस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेतील वरिष्ठ लिपिक सुनील वसंत गावित लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे धुळे पोलीस दलातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सन २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले आहे. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांची राहिलेली बिले मंजूर होऊन मिळणे करिता दि. 10/07/2024 रोजी पोलीस अधीक्षक, धुळे कार्यालय अर्ज केले होते. त्यापैकी त्यांना 1,29,888/रुपयांचे बिल त्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे उर्वरित बिलाबाबत आलोसे यांची कार्यालयात भेट घेऊन चौकशी केली असता, आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांना अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात व बाकी राहिलेली बिले वाढवून देण्याचे काम करून देण्याकरीता कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार ला. प्र. विभाग धुळे कार्यालयात दि. 02/08/2024 रोजी समक्ष येऊन दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि. 02/08/2024 रोजी पंचां समक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे जाऊन पडताळणी केली असता, आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने 2,000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध धुळे शहर पोस्ट येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि.धुळे
तक्रारदार- पुरुष, 62 वर्ष.
आरोपी– सुनील वसंत गावित, वय-48 वर्ष, नोकरी- वरिष्ठ लिपिक, लेखा शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे.
*लाचेची मागणी- दिनांक 02/08/2024 रोजी 2,000/- रु.
*लाच स्वीकारली – दिनांक 02/08/2024 रोजी 2,000/- रु.
लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे धुळे पोलीस दलातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सन 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले आहे. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांची राहिलेली बिले मंजूर होऊन मिळणे करिता दि. 10/07/2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक, धुळे कार्यालय अर्ज केले होते. त्यापैकी त्यांना 1,29,888/रुपयांचे बिल त्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे उर्वरित बिलाबाबत आलोसे यांची कार्यालयात भेट घेऊन चौकशी केली असता, आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांना अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात व बाकी राहिलेली बिले वाढवून देण्याचे काम करून देण्याकरीता कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने 2,000/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार ला. प्र. विभाग धुळे कार्यालयात दि. 02/08/2024 रोजी समक्ष येऊन दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि. 02/08/2024 रोजी पंचां समक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे जाऊन पडताळणी केली असता, आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने 2,000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध धुळे शहर पोस्ट येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी– मा पोलीस अधीक्षक, धुळे
परिवेक्षण अधिकारी-
श्री. सचिन साळुंखे
पोलीस उपअधिक्षक ला.प्र.विभाग, धुळे.
मो.न.9403747157, 9834202955*
सापळा तपासी अधिकारी-
रूपाली खांडवी,
पो. निरी.,ला.प्र. विभाग, धुळे*
मो.नं. 8379961020.
सापळा पथक–
पो.हवा.राजन कदम, पो.ना. संतोष पावरा सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे .