नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वॉर रूम सुरू करण्यात आले आहे. या वॉर रूमला राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा पडोळ, त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे किसन खताळे उपस्थित होते.
या भेटीदरम्यान श्री. डवले यांनी, संपूर्ण वॉर रूमची ची पाहणी करून कामकाजाची माहिती घेतली. वॉर रुम भेटीपूर्वी श्री डवले यांनी गोवर्धन ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी बचत गटामार्फत ‘तत्त्व’ ब्रँड अंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या साड्यांची प्रक्रिया बघितली. सी .एल .एफ क्लस्टर ला शासनाकडून आलेल्या निधीचा वाटप कसा होतो याचा आढावा घेतला. बँकेत जाऊन ई- केवायसी कसे होते याची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या सेस निधी मधून महिरावणी येथील बचत गटांना देण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी केली.