गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिवाळीत कर्मचा-यांना मिळाली अनोखी भेट….इतक्या कर्मचाऱ्यांना या कंपनीने दिली कार भेट

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 5, 2023 | 4:35 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20231105 093749 Dailyhunt

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिवाळीच्या काळात अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना बोनस देतात. काही मालक कंपन्यांच्या नफ्यातला भाग देतात. सुरतचा हिरे व्यापारी आपल्या कर्मचाऱ्यांना कधी कार तर कधी फ्लॅट भेट देतो. आता अशाच एका मालकाने आपल्या कामगारांना कार भेट दिल्या आहेत.

दिवाळी हा जसा दिव्यांचा सण असतो, तसाच तो आनंद वाटण्याचा सण आहे. या सणाचा उत्साह सर्वत्र असतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच कंपन्या आपापल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देत असतात. दिवाळी हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण मानला जातो. नोकरदार लोकांसाठी या सणाला कंपन्यांकडून मिळणाऱ्या भेटवस्तूंना एक विशेष महत्व असते. दिवाळीनिमित्त कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू, बोनस देत असतात. भारतात जवळपास बहुतांश कंपन्या दिवाळीनिमित्त फूल ना फुलाची पाकळी भेट देतात.

सुरतमधील हिरे व्यापाऱ्यापाठोपाठ हरियाणातील ’एमआयटीएस हेल्थकेअर फार्मास्युटिकल कंपनी’ने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार दिल्या आहेत. कंपनीने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केल्या आहेत. अर्थात सर्व कर्मचाऱ्यांना कार मिळालेल्या नाहीत. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या भेटवस्तू मिळाल्या आहेत. आता कंपनी आणखी ३८ कर्मचाऱ्यांना कार देणार आहे. अशा प्रकारे औषध कंपनीच्या ५० कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून गाड्या मिळणार आहेत. या कंपनीचे मालक एमके भाटिया यांची कंपनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेलिब्रिटीसारखे वागवते. मेहनती कर्मचाऱ्यांच्या जोरावरच कंपनी सध्याच्या स्थितीपर्यंत पोहोचू शकली आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या मेहनतीचे आणि त्यांच्या निष्ठेचे फळ म्हणून या भेटवस्तू दिल्या जातात.

या कंपनीतील शिल्पाने सांगितले, की ती हेल्थकेअरमध्ये आठ वर्षांपासून काम करत आहे. तिने सांगितले, की जेव्हा ती कंपनीत रुजू झाली तेव्हा संचालकाने सांगितले होते, की त्यांना कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट करायची आहे. आता ते स्वप्न पूर्ण झाले आहे. शिल्पा ही फार्मास्युटिकल कंपनीच्या पहिल्या १२ कर्मचाऱ्यांपैकी एक आहे, ज्यांना भेट म्हणून नवीन कार मिळाली आहे. दिवाळीत कर्मचाऱ्यांना मोठ्या भेटवस्तू देण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी चेन्नईतील एका आयटी कंपनीने आपल्या १०० कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केल्या होत्या. गुजरातचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया हे आपल्या कर्मचाऱ्यांना मोठमोठ्या भेटवस्तू देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कुणबी जातीचे पुरावे तपासणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर ही समिती गठीत …..नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘विशेष कक्ष’ स्थापन….

Next Post

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका…..पुढील उपचारासाठी एअर अ‍ॅम्बुलन्सने मुंबईत नेणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
eknath khadse e1697695903104

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका…..पुढील उपचारासाठी एअर अ‍ॅम्बुलन्सने मुंबईत नेणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
bjp11

शरद पवार गटाला धक्का….या माजी मंत्रीने त्यांच्या दोन पुत्रांसह केला भाजपामध्ये प्रवेश

जुलै 30, 2025
CM

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू….

जुलै 30, 2025
trump 1

भारतावर २५ टक्के ट्ररिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्पची घोषणा…

जुलै 30, 2025
IMG 20250730 WA0238 1

येवल्यातील विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक…

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011