नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाविकास आघाडीचे जागावाटप सुरु झाले नाशिक शहर कॉंग्रेसने नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य या दोन मतदारसंघावर दावा केलेला असतांना कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने नाशिक पूर्वच्या जागेवर उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय राऊत यांना उमेद्वारी देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंनीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे केली आहे.
ओबीसी विभागातील दांडगा जनसंपर्क असलेल्या सक्षम उमेद्वार असलेल्या विधानसभा जागांची मागणी केली आहे.उत्तर महाराष्ट्रात ओबीसी विभागाने लोकसभा निवडणुकीत अतिशय चांगले काम केले त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडणून आले .आताही वातावरण चांगले आहे.
ओबीसी विभागाने ओबीसी बहुल कॉंग्रेस पक्षाला मानणारे मतदार असलेल्या शिवाय त्याठिकाणी सर्वसंपन्न उमेद्वार असलेल्या मतदारसंघाची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.नाशिक विभागातून नाशिक पूर्वच्या जागे ओबीसी उमेदवाराला संधी देण्याची मागणी केली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात एक ते सव्वा लाख ओबीसी ,२५ ते ३० हजारच्या आसपास मुस्लीम ,४१ हजाराच्या आसपास अनुसूचित जाती आणि ३५ हजाराच्या आसपास अनुसूचित जमातीचे मतदार असून कॉंग्रेस पक्षाला अनुकूल आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने नाशिक पूर्वची जागा लढवावी अशी मागणी करतांना या मतदार संघात ४० वर्षापासून विजय राऊत काम करत आहे त्यांचा दांडगा जनसंपर्क या मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास नाशिक पूर्वची जागा कॉंग्रेस पक्षाने लढविल्यास निवडणून येऊ शकते.
राज्यांत ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे आहे त्यामुळे ओबीसी घटकांची संख्या अधिक असलेल्या मतदार संघाची चाचपणी करून उमेद्वार निश्चित करण्यात यावे अशी मागणी करतांना ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या राज्यांतील सर्व विभागांतील १७ मतदारसंघाची देखील माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिली.
ओबीसी घटकांतील मतदारांची संख्या देखील अधिक असलेल्या ठिकाणी ओबीसी उमेद्वार दिल्यास उमेदवार नक्की विजयी होतील शिवाय पक्षाच्या इतर उमेदवारांना फायदा होईल असे मत माळी यांनी व्यक्त केले.