इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती भाजप नेते राजेंद्र पिपाडा हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत एकाच व्यासपीठआवर दिसल्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कालच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिर्डी विधानसभा मतदार संघात महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यावर टीका केली. त्यात त्यांनी भाजपने उमेदवारी देतांना विचार करावा असे वक्तव्य केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा सत्कार समारंभ होता. या समारांभार राजेंद्र पिपाडानेही हजेरी लावली. त्यामुळे चर्चेला उधाण आले..
पिपाडा हे होमिओपॅथिक डॅाक्टर असून त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर दहा वर्षे ते सक्रिय आहे. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी राधाकृष्ण विखेपाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ते माजी नगरसेवक असून त्याची पत्नी ममता पिपाडा या नगराध्यक्षा राहिल्या आहे. विखेपाटील यांच्या विरोधात ते काटे की टक्कर देऊ शकतात त्यामुळे त्यांची चर्चा सुरु आहे.