मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ई-पिक पाहणी नसेल तर सरकारची मदत मिळणे अवघड…१ ऑगस्टपासून नोंदणी सुरु

by India Darpan
ऑगस्ट 2, 2024 | 2:01 pm
in राज्य
0
Untitled 7

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई- पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. यंदा ई-पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विम्यापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई- पीक पाहणी बंधनकारक केली आहे. १ ऑगस्टपासून जिल्ह्यात ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी अॅपद्वारे खरिपातील पिकांची नोंद करून घ्यावी. राज्य शासनाकडून २०२१ पासून ई- पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी हंगामातील पिकांची नोंद अॅपद्वारे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पहिल्या वर्षी योजनेस कमी प्रतिसाद मिळाला होता. परंतु, नंतरच्या दोन वर्षानंतर शेतकऱ्यांमध्ये जागृती झाल्यामुळे ई- पीक पाहणीला प्रतिसाद मिळत आहे. यंदा देखील ई-पीक पाहणीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. १ऑगस्टपासून शेतकऱ्यांना अॅपवर नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ही नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा
जिल्ह्यात १ ऑगस्टपासून ई-पीक पाहणीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.सरकारकडून विकसित करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी अॅपद्वारे शेतकरी शेतातील पिकांची नोंद करू शकतील. यानंतर तलाठी व कृषी सहायकांच्या स्तरावर नोंदणी करता येईल. यासाठी १५ ऑक्टोंबर ही शेवटची तारीख असणार आहे.

ई-पीक पाहणीचे महत्व
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात येते. परंतु, आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण केलेली आहे. अशाच शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. तसेच विमा कंपन्यांकडून देखील ई- पीक पाहणीचा अहवालाद्वारे शेतकऱ्यांना पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येते. यामुळे शेतकरी पीक विम्याच्या मदतीसाठी पात्र असताना देखील ई-पीक पाहणी झालेली नसल्याने अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अपात्र ठरवण्यात येते. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदणी करता येईल. नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ताबडतोब करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लाडकी बहीण योजनेविरुध्द मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल…कोर्टात नेमकं काय घडलं

Next Post

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती काँग्रेसच्या वाटेवर….भाजपला मोठा धक्का

India Darpan

Next Post
Untitled 8

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती काँग्रेसच्या वाटेवर….भाजपला मोठा धक्का

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011