इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम यास रात्री नाशिकहून कडेकोट बंदोबस्तात दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यासाठी रेल्वेने नेण्यात आले. अबू सालेम महिनाभरापूर्वी तळोजा कारागृहातून नाशिकरोड कारागृहात आण्यात आले होते. तेव्हापासून तो नाशिक कारागृहात आहे.
दिल्लीतील न्यायालयाने सालेमला हजर करायचे असल्यामुळे कारागृह प्रशासनाने रात्री सालेमला नाशिक शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
त्यावेळी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाबाहेर आणि रेल्वे स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कैदी पार्टीत ४४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बरोबर वैद्यकीय पथकही आहे. यामुळे लॅमरोडवरील कारागृहाबाहेरील परिसरास पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातही रेल्वे पोलीस, लोहमार्ग पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.