इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वेगवेगळ्या भूमिका करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार अमिताभ बच्चन आता गुजराती चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ते देव बनून प्रेक्षकांना हसवणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘फक्त पुरुषो माते’ असून त्याचा नुकातच ट्रेलर रिलीज झाला आहे. कृष्णकांत महेशलाल ब्रह्मानंद विश्वस्वामी असे या चित्रपटातील त्यांच्या पात्राचे नाव आहे.
हा चित्रपट २३ ऑगस्ट रोजी चित्रपगृहात प्रदर्शित होणार आहे. अमिताभ बच्चन यांच्याशिवाय यश सोनी, मित्रा गढवी, ईशा कंसारा आणि दर्शन जरीवाला हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत काम करताना दिसणार आहेत. गुजराथी चित्रपटात पहिल्यांदाच अमिताभ दिसणार आहे. याअगोदर त्यांनी गुजरातसाठी पर्यटनांच्या जाहीराती केल्या होत्या.
https://www.instagram.com/reel/C-C7n0pMqs7/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==