इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चेन्नईः केरळमधील कोझिकोडमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाच्या मृत्यूनंतर शवागाराबाहेर थांबलेला असल्याची घटना समोर आली आहे. कदाचित त्याला माहीत नसेल की त्याचा स्वामी आता या जगात नाही. या कुत्र्याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण याला माणसाचा सोबती म्हणत आहेत तर काहीजण याला खरी निष्ठा म्हणत आहेत.
केरळमधील कन्नूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागाराबाहेर एक कुत्रा गेल्या चार महिन्यांपासून थांबला आहे. रुग्णालयात येणारे लोक अनेकदा हा कुत्रा तिथेच बसलेले दिसतात, जिथे तो चार महिन्यांपासून त्याच्या मालकाची वाट पाहत असतो. जिल्हा रुग्णालयातील अधिकारी कुत्र्याच्या मालकाची ओळख पटवू शकले नाहीत. कुत्र्याची सतत दक्षता आणि असहायता सूचित करते, की तो त्याच्या मालकाची वाट पाहत आहे. हॉस्पिटलचे अटेंडंट राजेश कुमार यांनी या कुत्र्य़ाला चार महिन्यांपूर्वी शवागारजवळ बसलेले पहिले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, पहिल्या दिवशी आपण कुत्र्याकडे लक्ष दिले नाही; पण दुसऱ्या दिवशी तो तिथे असताना आमचे लक्ष त्या पाळीव कुत्र्यावर गेले. याबाबत आम्ही स्थानिक लोकांना विचारले असता त्यांनी सांगितले, की हा कुत्रा रुग्णाला घेऊन रुग्णालयात आला होता. त्याचा मृत्यू झाला.
रामू हा कुत्रा चार महिन्यांपासून मालकाची वाट पाहत बसला आहे. हा कुत्रा शवागारात मृतदेह घेऊन जाताना रॅम्पवर दिसतो; मात्र तो शवागाराच्या गेटच्या पलीकडे न जाता तिथे उभा राहून वाट पाहतो. कुत्रा अनेकदा जवळच्या फिजिओथेरपी विभागाच्या इमारतीत जात असला तरी तो रात्री शवागारात परततो. याशिवाय परिसरातील भटक्या कुत्र्यांमध्ये कुत्रा मिसळत नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ माया गोपालकृष्णन कुत्र्याला अन्न देतात. तसेच या कुत्र्याबाबत माहिती देताना ते म्हणाले, की तो अंडी किंवा मासे खात नाही. त्याला भातही आवडत नाही; मात्र, डॉ.माया यांनी त्याला ‘रामू’ असे नाव दिले. कन्नूर येथील एका महिलेने कुत्रा दत्तक घेण्यासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे डॉक्टरांनी सांगितले.