बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कांस्य पदक पटकविणा-या स्वप्निल कुसळेच्या यशाने भोसलाच्या शिरपेचात मानाचा तुरा

by India Darpan
ऑगस्ट 1, 2024 | 8:52 pm
in इतर
0
Untitled 2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीच्या ५० मिटर प्रकारात कांस्य पदक पटकविणारा स्वप्निल कुसळे हा सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी स्कूल आणि कॉलेजचा रामदंडी आहे. भारतासाठी पदक मिळवून देणाऱ्या स्वप्निलच्या या यशाने भोसला च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून भोसला आणि पदक विजेत्या खेळाडूंची यशस्वी परपंरा दर्शवणारे हे नाते कायम असल्याचे दिसते. या यशामुळे संस्था आणि संपूर्ण कॅम्पसच्यावतीने स्वप्निलचे अभिनंदन केले आहे, यानिमित्ताने पदाधिकारी,क्रीडाशिक्षकांनी जुन्या काळातील आठवणींना सुध्दा उजाळा दिला आहे.

सैनिकी शिक्षणासाठी देशात परिचित असलेली सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला मिलिटरी स्कूल,कॉलेज हे दर्जेदार,नावाजलेले खेळाडू घडविणारी स्थाने म्हणून परिचित आहे. यापुर्वीच्या शासनाच्या क्रीडाप्रबोधीनी आणि कॅम्पसमध्ये असणाऱ्या खेलो इंडियाद्वारे अनेक नामांकित खेळाडू संस्थेने देशाला दिले आहे, त्यात अर्जुन पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत,संजीवनी जाधव,किसन तडवी,ताई बामणे,मोनिका आथरे,कोमल जगदाळे यासारख्या धावपटूंचा उल्लेख करता येईल.
स्वप्निलचे यशही इतरांसाठी प्रेरणादायी

स्वप्निलने भोसला मिलिटरी स्कूलमध्ये असणाऱ्या नेमबाजीच्या क्रीडाप्रबोधीनीद्वारे तत्कालीन राज्य प्रशिक्षक नानासाहेब देशमुख यांच्याकडे आपल्या खेळाला सुरवात केली. इयत्ता नववी,दहावीचे( सन २००९ ते २०११) त्याचे शिक्षण हे स्कूलमध्ये झाले. त्यानंतर पुढे ११ वी ते प्रदवीचे प्रथम वर्षे वाणिज्य शाखेचे (सन २०११ ते २०१४) शिक्षण हे त्याने भोसला मिलिटरी कॉलेजमधून घेतले. आपल्या या शैक्षणिक काळात त्याने नेमबाजीचा खेळ सुरुच ठेवला. संस्थेच्या खेलो इंडिया उपक्रमाचा देखील त्याला फायदा झाला. नियमित सराव व तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे त्याला हे यश संपादन करता आले. संस्थेचे कार्याध्यक्ष अँड.अविनाश भिडे, सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पगारे, कार्यवाह मिलिंद वैद्य आदीं पदाधिकाऱ्यांनी स्वप्निलच्या या य़शाबद्दल अभिनंदन करत आनंद भावना व्यक्त केली नियमित सराव,कष्ट करण्याची तयारी आणि योग्य मार्गदर्शनामुळेच त्याला हे यश संपादन करता आले. तो आमच्या संस्थेचा रामदंडी असल्याने तसेच त्याने भारतासाठी पदकाची कमाई करून उल्लेखनिय कामगिरी केली आहे. याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो, भोसला कॅम्पस ही खेळाडूंची खाण असून त्याचे हे यश आमच्या इतर उदयोन्मुख खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त महसूल पंधरवड्याचा शुभारंभ

Next Post

नाशिक-मुंबई महामार्गावरील रस्त्यांच्या कामाबाबत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले हे निर्देश

India Darpan

Next Post
IMG 20240801 WA0388 1

नाशिक-मुंबई महामार्गावरील रस्त्यांच्या कामाबाबत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011