नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेती व्यवसाय सध्या जिकरीचा झालाय,त्यातच अनेक शेतक-यांना अडचणीचा सामना करत शेती व्यवसाय करावा लागत आहे, अशाच एका तरुण शेतक-याने वडिलांच्या मदतीने टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ शेतीसाठी उपयुक्त असणारे मिनी ट्रॅक्टर म्हणजे पावर टिलर मशिन बनविले.
शेती करतांना शेतक-यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यातच त्याच्या मालाला भाव मिळेल याची शाश्वती नसते. कमी खर्चात लागवडी पासून उत्पादन निघेपर्यंत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नाशिकच्या येवला तालूक्यातील हडप सावरगाव येथील प्रविण कोल्हे या तरुण शेतक-याने टाकावू वस्तू पासून मिनी ट्रॅक्टर मह्णेज छोटा पावर ट्रिलर बनवला आहे. घरी जून्या पडलेल्या वस्तू जमा करत त्याने अवघ्या २ हजार रुपयात हा मिनी पावर ट्रिलर बनवला आहे.यातून शेतीची कोळपणी,नांगणी,सरी पाडणे,अशा विविध काम केली जाता.हे सर्व करतांना वडिल शशिकांत कोल्हे यांचे मार्गदर्शन घेतले आणि एक आगळ-वेगळ हाताने चालवणारे मिनी ट्रॅक्टर जणू स्वताच्या कल्पनेतून साकार झाले आणि त्याचा फायदा स्वताच्या शेतीसाठी करता आला.
एकुणच शेती साठी काम करतांना येणा-या अडचणींवर मात करत तयार करत एका तरुण शेतक-याने केलेला टिकावू वस्तू पासून टिकाऊ मिनी ट्रॅकरचा गावासह पंचक्रोशीतील शेतक-यांनी स्वागत केले असून त्यांचा हा मिनी ट्रॅक्टरचा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.