इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पॅरिस ऑलिम्पिक नेमबाजीत कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे यांनी ब्रान्झ पदक जिंकले. आज झालेल्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये त्याने हे पदक मिळवले.
नेमबाजीत भारताला हे तिसरे पदक मिळाले आहे. याआधी मनू भाकरने दोन तर सरबज्योत सिंगने एक कांस्यपदक जिंकले आहे. स्वप्निलचे ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या फेरीत टॅाप आठ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघात निवड झालेला स्वप्निल हा महाराष्ट्रातील एकमेक खेळाडू आहे. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील आहे. त्याने पुण्यातील बालेवाडीत क्रीडा प्रबोधिनीमध्ये नेमबाजीचा सराव केला आहे.
तब्बल ७२ वर्षांनी कोल्हापूरला पदक
कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळने पॅरिस ऑलिम्पिकपद पदक जिंकले. त्याने कास्यपदक जिंकताच केवळ कोल्हापूर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात आनंदोत्सव सुरू झाला आहे. तब्बल ७२ वर्षांनी कोल्हापूरच्या खेळाडूंनी ऑलम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवले. १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिपिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील हा खेळाडू. वडील, सुरेश कुसाळे हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक. तर आई अनिता या कांबळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.