इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरः राजकारणासाठी दिग्गज नेत्यांना आपले छंद बाजूला ठेवावे लागतात; परंतु बालहट्टापुढे त्यांना झुकावे लागते. केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना आपल्या नातीसाठी बाजारात जावे लागले होते. नातीसाठी त्यांनी सायकल खरेदी केली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुलींच्या शाळेत गायन करावे लागले. आता दोन नेत्यांनी गाणे म्हटलाचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे.
फडणवीस यांनी पुष्पा चित्रपटातील गाण्याचे बोल म्हटले. एका लग्न सोहळ्यात फडणवीस यांनी “नज़रें मिलते ही नज़रों से नज़रों को चुराए कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए” या गाण्याचे बोल म्हटले. उपस्थितांनी त्यांच्या गाण्याला चांगलीच दाद दिली. फडणवीस यांना पुष्पा चित्रपटातील हे गाणे चांगलेच आवडल्याचे स्पष्ट झाले. फडणवीस यांच्यानंतर गडकरी यांची गाणे म्हणण्याची वेळ आली. गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन यांनी गाणे गायले. फडणवीस यांची आवड नवीन चित्रपट आहे, तर गडकरी यांची आवड जुने गाणे होते. गुलजार यांनी लिहिलेले गाणे त्यांनी म्हटले. लता मंगेशकर आणि अनुप घोषल यांनी १९८३ मध्ये आलेले मान्सून या चित्रपटातील “तुझसे नाराज नही जिंदगी” हे गीत गात गडकरी दांपत्याने उपस्थितांची दाद मिळवली.
ही संधी या दोघांना नागपूरमधील उद्योजक प्यारे खान यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त मिळाली. या कार्यक्रमास गडकरी आणि फडणवीस यांनी हजेरी लावली. या वेळी दोन्ही नेत्यांनी गीत गायले. यामुळे रिशेप्शन आलेल्या लोकांना आनंद द्विगुणीत झाला.