माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
उद्या गुरुवार दि १ ऑगस्टपासून रविवार दि. ४ ऑगस्ट पर्यंतचा चार दिवसात महाराष्ट्रात पुन्हा भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः ३ व ४ ऑगस्ट (शनिवार-रविवारी) ला पावसाचा जोर अधिक असू शकतो. आतापर्यंत ओढ दिलेल्या पर्जन्यछायेतील प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा करू या!
चार दिवसातील जिल्हावार पावसाची तीव्रता खालीलप्रमाणे असु शकते.
अति जोरदार – १४ जिल्हे
मुंबईशहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
जोरदार – १६ जिल्हे
नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा
मध्यम ते जोरदार- ६ जिल्हे
सांगली, सोलापूर, धाराशिव, बुलढाणा ,अकोला ,वाशिम
३- सोमवार दि. ५ ऑगस्ट(आमावस्ये)पासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पूर्ण नव्हे पण काहीसा पावसाचा जोर कमी होऊ शकतो.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune