नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान म्हणाले की अंशुमन गायकवाड यांनी क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते कायम स्मरणात राहतील. ते एक दैवी देणगी लाभलेले खेळाडू आणि अद्वितीय प्रशिक्षक होते.
एका एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले; “अंशुमन गायकवाड यांनी क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते चिरकाल स्मरणात राहतील. ते एक दैवी देणगी लाभलेले खेळाडू आणि असामान्य प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”