इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता सुजय विखे पाटील यांनी विधानसभा लढवण्याचे संकेत दिले आहे. त्यांची संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी आहे. त्याबाबत त्यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात हे आमदार असून राहुरीत प्राजक्त तनपूरे आमदार आहे. थोरात व विखेपाटील यांच्यात विळ्या- भोपळ्याचे नाते सर्वश्रूत आहे. थोरात संगमनेरमधून १९८५ पासून २०२९ पर्यंत आठ वेळा निवडून आले आहे. त्यामुळे येथे लढत झाली तर ती रंगतदार होणार आहे.
राज्यातील विखेपाटील सारखेच लोकसभेत पराभूत झालेल्या अ्नेकांना आता विधानसभेचे वेध लागले आहे. त्यात त्यांना त्यांचा पक्ष संधी देतो का हे महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी ही संधी मिळू शकते. पण, काही ठिकाणी राजकीय समीकरण जुळत नाही. अहमदनगरमध्ये शिर्डी विधानसभा मतदार संघातून अगोदरच राधाकृष्ण विखेपाटील यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. त्यामुळे एकाच घरातील दोन उमेदवारांना भाजप उमेदवारी देईल का हा सुध्दा प्रश्न आहे.