नाशिकच्या देवळा तालुक्यातील मटाणे येथे दारुच्या नशेत मित्राकडून मित्राचा खून झाल्याची घटना घडलीय.मटाणे येथे संतोष पवार याने आपला मित्र दिपक निंबा साबळे याच्या सोबत दारु पिल्यानंतर किरकोळ वाद झाले त्यातून दिपक साबळे यांच्या छातीत चाकू खूपल्याने दिपक साबळे यांचा मृत्यू झालाय.दोघे मित्र हे सकाळ पासून सोबत होते साबळे हे कांद्याचा व्यवसाय करीत होते.दोघांनी सकाळी दारू पिल्यानंतर दोघे घरी गेले मात्र संध्याकाळी संतोष पवार याने पुन्हा मित्र दिपक साबळे यांना बोलवून घेतले आणि त्यातून पुन्हा किरकोळ वाद झाल्यानंतर संतोष पवार याने मित्राच्या छातीत चाकू भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला,या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिस घटनास्थळी पोहचत त्यांनी मृत व्यक्तीला शासकीय रुग्णालयात दाखल केले तर काही वेळातच संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.दरम्यान रात्री देवळा पोलिस स्थानका जवळ संतप्त मटाणे येथिल गावक-यांनी,नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.