इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेत शरद पवारांनी मैदानात यंग ब्रिगेडला उतरवण्याचे निश्चित केले असून त्याची यादीही तयार केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व तरुण अजित पवाराच्या गटाला शह देण्यासाठी तयार केले जात असून त्यांची ही फाईट रंजक होणार आहे.
त्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, सिन्नर नाव अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे बारामती, अणुशक्ती नगर, श्रीवर्धन, परळी, कागल, आंबेगाव, गेवराई, हडपसर, पुसद, आष्टी, अहेरी, अमळनेर, इंदापूर, मावळ, फलटण, परळी, तुमसर, वडगाव शेरी या मतदार संघाची नावे समोर आली आहे.
शरद पवारांची ही खेळी विदयमान आमदारांच्या अडचणी वाढवू शकतात. लोकसभेत सर्वाधिक स्ट्राईक रेट शरद पवार गटाचा राहिला आहे. त्यामुळे विधानसभेत पवार तरुणांना संधी देऊन त्यांचे बळ वाढवणार आहे.