नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सवंगडी संस्था नाशिकतर्फे पर्यावरण व क्रीडा संवर्धनाच्या उद्देशाने पथनाट्य स्पर्धा, गणेशमूर्ती कार्यशाळा, वृक्षारोपण व संवर्धन असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि. ४) सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री कालिकादेवी मंदिर संस्थानच्या सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. सहभागींना संस्थेच्या वतीने शाडूमाती, बेस व टूल पुरविण्यात येणार आहे. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी ९१७२९१४८२४, ९४२१८९९४२० किंवा ७३८५९५१६४५ या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच, कार्यशाळेच्या दिवशी सकाळी ८.३० वाजेपासून उपक्रमस्थळीही नावनोंदणी करता येणार आहे. तरी जास्तीत जास्त गणेशप्रेमींनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपक्रमाच्या समन्वयक संगीता हिंगमिरे व साधना बैचे यांनी केले आहे. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सविता भुसारे, विनीत हिंगमिरे, दुर्गा बैचे व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.