लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा उत्पादन व बाजारभावचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे कृषी मंत्रालयातील शेतकरी कल्याण विभाग व वाणिज्य मंत्रालयातील ग्राहक संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक महाराष्ट्र व कर्नाटक दौऱ्यावर आहे. आज या पथकाने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट दिली. यावेळी या केंद्रीय संयुक्त पथकाची माहिती शेतकरी संघटनेला कळू नये म्हणून कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती.
या बैठकीत साठवणूक केलेला किती कांदा शिल्लक असून नवीन लागवड केलेल्या कांद्याचे किती उत्पादन येणार याची माहिती ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली. तर विक्रीला येणाऱ्या कांद्याचे बाजार भाव का घसरले याची माहिती शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत जाणून घेतली आहे.