त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रावणात पहिला, दुस-या, चौथ्या व पाचव्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मारण्यासाठी मोठी गर्दी होत असते. येणा-या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागामार्फत जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. तिसरा श्रावणी सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी असून या दिवशीचे जादा वाहतुकीचे नियोजन आपणांस स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.
श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा, चौथा व पाचवा श्रावणी सोमवार अनुक्रमे दिनांक ०५.०८.२०२४, १२.०८.२०२४, २६.०८.२०२४, ०२.०९.२०२४ रोजी असल्याने सदर दिवशी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. या कालावधीत वाहतुक सुरळीत व्हावी म्हणुन वरील तारखांना नाशिक विभागामार्फत नाशिक येथील नविन सिबीएस (ठक्कर बसस्थानक) येथे खालील प्रमाणे बसेसचे नियोजन केलेले आहे.
नाशिक ते त्र्यंबक –२५ बसेस
ईगतपुरी ते त्र्यंबक (मार्गे म्हसुर्ती / वैतरणा) – ५
पेठ ते त्र्यंबक (मार्गे अंबोली)– ३
एकुण -३३ बसेस