इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी मुंबईः दाऊद शेखने यशश्री शिंदे हिची हत्या लग्नाला नकार दिला म्हणून केली असल्याची कबूली दिली आहे. दाऊद आणि यशश्री यांची अनेक वर्षापासून ओळख होती. शालेय जीवनापासून त्यांची मैत्री होती. त्याने बोलवल्यानुसार, ती स्वतः त्याला भेटायला गेली; परंतु लग्न करण्यावरून त्यांच्यात वाद झाल्याने दाऊदने तिचा खून केला.
दाऊदने यशश्रीला लग्नासाठी मागणी घातली होती. त्याने लग्नासाठी तगादा लावला होता. लग्न करून बेंगळुरूला स्थायिक होण्याचा त्यांचा विचार होता; मात्र यशश्रीने त्याला नकार दिला. २५ जुलै रोजी यशश्रीला भेटण्यासाठी तो बेंगळुरूहून आला. लग्नावरून दोघांमध्ये भांडण झाले. यशश्री आणि दाऊदमध्ये तीन-ते चार वर्षांपासून मैत्री होती. यशश्री उरणमध्ये जिथे राहायची, तिथेच दाऊद राहायचा. २०१९ मध्ये यशश्रीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. दाऊद तुरुंगात गेला होता. सुटकेनंतर तो कर्नाटकला गेला. दाऊद पुन्हा उरणमध्ये आल्यानंतर त्याने यशश्रीला फोन करून दोघांनी भेटायचे ठरवले. त्यानुसार, ते दोघे ठरले.
दाऊदविरोधात हत्या आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाऊदला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लग्नाला नकार दिल्याने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दाऊदने दिली.