इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः भाजपच्या अध्यक्षपदी रोज वेगवेगळी नावे समोर येत असतांना आता अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फडणवीस यांनी सहकुटुंब भेट घेतल्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे. त्यांची निवड झाल्यास भाजपचे अध्यक्षपदी निवड होणारे नितीन गडकरी यांच्यानंतरचे ते महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार यश न मिळाल्याने त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. आता मोदी यांची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर त्यांचे नाव आता चर्चेत आले आहे. यापूर्वी विनोद तावडे यांची भाजपच्या अध्यक्षपदी निवड होण्याची चर्चा होती. पण आता त्यांचे नाव मागे पडले आहे. पण फडणवीस यांनी या शर्यतीत आघाडी घेतली. फडणवीस हे शाह यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.