मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सर्वर समस्येमुळे राज्यातील रास्तभाव दुकानांमधून ऑफलाईन पद्धतीने अन्नधान्य होणार वाटप…परिपत्रक जारी

by Gautam Sancheti
जुलै 30, 2024 | 7:33 pm
in राज्य
0
Untitled 109

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वर समस्येमुळे गेल्या आठ दिवसापासून स्वस्त धान्य दुकानांमधून रेशनचे वाटप करण्यास अडचण निर्माण होत होती. रेशन वाटपाच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेत मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर राज्यातील रास्तभाव दुकानांमधून ऑफलाइन धान्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे. IMPDS पोर्टलवरील unautomated सुविधेमार्फत ऑफलाईन अन्नधान्य वाटपास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्याचे बायोमॅट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरीता रास्तभाव दुकानांमध्ये 4G तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या आहेत. राज्यात काही दिवसापासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरण करतांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे. या तांत्रिक समस्येमुळे अन्नधान्य वितरण ऑफलाईन करण्यास मान्यता देण्याची विनंती क्षेत्रीय कार्यालयांनी केली होती. या मागणीचा विचार करून नागरिकांना तातडीने रेशनचा लाभ देण्यासाठी आपण ऑफलाइन पद्धतीने रेशनचे वाटप करावे याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाला आदेश दिले होते.

सर्वर मध्ये झालेल्या समस्येमुळे राज्यातील अनेक नागरिक रेशनच्या धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्यातील अनेक भागांमधून नागरिकांनी याबाबत तक्रारी दिल्या होत्या त्याचबरोबर अन्नधान्य वितरण करणाऱ्या दुकानदारांनीही याबाबतीत तक्रारी या मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केल्या होत्या त्यानुसार विभागाने बैठक घेऊन यावर तात्काळ उपायोजना कराव्यात अशा सूचना देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या त्यानुसार केंद्र सरकारची चर्चा करून ऑफलाइन अन्नधान्य वितरण करण्यास आज परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र शासनाने दि.१७.०४.२०२३ रोजीच्या पत्रान्वये मानवी/Unautomated अन्नधान्य वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. सदर मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाईन धान्यवाटप करण्याकरीता रास्तभाव दुकाननिहाय लॉगिन तयार करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दि.३१.०७.२०२३ रोजीच्या ई- मेलद्वारे देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे लॉगिन IMPDS पोर्टलवर तयार करण्यात आले असून ज्या रास्तभाव दुकानांचे लॉगिन IMPDS पोर्टलवर तयार करण्यात आले नसतील, अशा रास्तभाव दुकानांचे लॉगीन तात्काळ तयार करण्यात यावे अश्या सूचना करण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण होईपर्यंत एक विशेष बाब म्हणून ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी देण्यात येत आली आहे. ऑफलाईन अन्नधान्याचे वितरण शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात यावे व त्यांनी त्याबाबतच्या नोंदी प्रमाणित कराव्यात. या कालावधीतील ऑफलाईन वितरण केलेल्या धान्याचा तपशिल शासनास सादर करावा. तसेच ऑफलाईन वाटप करण्यात आलेल्या अन्नधान्याचा तपशील FPS Login द्वारे IMPDS पोर्टलवर भरण्याची तसेच केवळ राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांस अन्नधान्य वितरीत करण्याची सर्व जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी/उपनियंत्रक शिधावाटप यांची राहील. तसेच सदर ऑफलाईन सुविधा फक्त माहे जुलै, २०२४ मधील अन्नधान्य वितरणाकरीता उपलब्ध राहील अशा सूचना परिपत्रकाद्वारे करण्यात आल्या आहेत.

यावेळी बोलताना श्री.भुजबळ म्हणाले की, कितीही तांत्रिक समस्या विभागापुढे निर्माण झाल्या तरी देखील राज्यातील एकही नागरिक हा धान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणेच प्रत्येक नागरिकाच्या घरात धान्य पोचवले जाईल.

नाशिक : रिक्षा प्रवासात पुणे येथील महिलेच्या बॅगेतील पर्सवर भामट्यांनी डल्ला मारला. या पर्समध्ये सोन्याचे मंगळसुत्र,कानातील झुबे,बांगड्या व पाटल्या असा सुमारे २ लाख ९६ हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश रामदास वाणी (रा.पिपळे सौदागर,पुणे) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. वाणी कुटूंबिय शुक्रवारी (दि.१९) नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आले होते. पहाटेच्या सुमारास गडकरी सिग्नल ते दिपालीनगर दरम्यान ते रिक्षातून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. गडकरी चौकात ते ज्या रिक्षात बसले त्यात दोन प्रवासी होते. अज्ञात सहप्रवासी असलेल्या चोरट्याने श्रीमती वाणी यांच्या बॅगेतील दागिणे हातोहात लांबविले. बॅगेतील दागिणे ठेवलेली पर्स भामट्यांनी लांबविल्याची घटना वाणी दांम्पत्य नातेवाईकांच्या घरी पोहचल्यानंतर समोर आली. या पर्समध्ये सोन्याचे मंगळसुत्र,कानातील झुबे,बांगड्या व पाटल्या असा सुमारे २ लाख ९६ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास उपनिरीक्षक निसार शेख करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला हा मोठा करार….

Next Post

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण १० निर्णय….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
mantralay with logo 1024x512 1

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण १० निर्णय….

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011