नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2024-2025 साठी राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड मार्फत मका, तूर, चना, मूग, उडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आधारभूत किंमत खरेदी योजनेचा तसेच त्याअनुषंगाने नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हा मार्केटिंग अधिकारी आर. एस. इंगळे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
शेतकऱ्यांनी https://esamridhi.in/#/login या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृध्दी पोर्टलवर खरेदी Pre-registration करावे. पोर्टलवरील नोंदणीसाठी येणाऱ्या अडचणी व अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी बी. आर. पाटील यांच्याशी 8108182935 मोबाईल क्रमांकावर व NeML कार्यालयाचे प्रतिनिधी मनोज कोर यांच्याशी 9404826862 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री. इंगळे यांनी केले आहे.