इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील पूरपरिस्थितीवरुन राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतक राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबहाद्दर असा केला. यानंतर मनसेचे नेते गजानन काळे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
गजानन काळे यांनी आमदार मिटकरी यांनी उत्तर देतांना म्हटले आहे की, ७० हजार कोटीचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी ( हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत) तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय. अजित दादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राजसाहेब ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर …??? हिम्मत असेल तर स्वतः चा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी…!!! मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू …
उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका…पक्ष चोरून पण १ खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची
(ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले) टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला …आम्हाला शिकवायचं नाय,
लायकीत राहायचं, लायकीत !!!