इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक -हौशी रोप स्किपींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आणि क्रीडा भारती,नाशिक यांच्या सहकार्याने नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे उद्या दिनांक ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर,२०२३ दरम्यान राष्ट्रीय रोप स्किपिग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत उपकानिष्ट, कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा तीन वयोगटाचा समावेश आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन उद्या सायंकाळी ६.०० वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री भरती पवार यांच्या हस्ते आणि नाशिकचे आमदार ऍड. राहुल ढिकले,देवयानी फरांदे, सिमा हिरे, भा. ज. पा चे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी,जेष्ठ नेते विजय साने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोप स्किपिंग फेडेरेशन ऑफ इंडियाचेसचिव निर्देश शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, आर. यास. एफ. आय. चे अध्यक्ष शैलेश शुक्ल, सरचिटणीस सुनील केदार, सरचिटणीस नाना शिलेदार, हिमगौरी आडके, रोहिणी नायडू,- वानखडे, तानाजी जायभावे, श्याम बडोदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र रोप स्किपींगचेसचिव संजय पाटील, विनोद शिरभाते, विजय बनसोडे, राकेश पाटील, स्वप्नील कर्पे, सुरेखा पाटील, मंजिरी पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कामिनी केवट, जयश्री भुसारे, साक्षी खोडे, क्षितिजा खटावकर, शैलजा जैन, पूजा पत्रीकर, अक्षदा शिंदे, गीता चित्ते, चारुलता सूर्यवंशी, पृथ्वी लोखंडे रश्मी पराते, पवन खोडे, बाळासाहेब रणशूर आणि सर्व खेळाडू, कार्यकर्ते प्रत्यनशील आहेत. तरी नाशिकच्या जस्ताच्या जास्त क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.