इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः पिंपरी-चिंचवडच्या किवळे भागात मोबाइल गेमच्या आहारी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाने गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठी १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आर्य उमेश श्रीराव असे या मुलाचे नाव असून तो दहावीत शिकत होता. या मुलाच्या खोलीत त्याला इमारतीवरून उडी मारण्याचे मोबाइल गेमवरून जे टास्क दिले होते, त्याचे रेखाटन केलेला कागद सापडल्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आले.
या कागदार कोडिंगच्या भाषेत लिहले होते. त्यात एका कागदावर घराचे स्केच होते. त्यावर ‘गॅलरीतून जम्प कर’ असा टास्क होता. ते फॉलो करण्यासाठी आर्यने १४ व्या मजल्यावरून उडी घेतली.
आर्यचे वडील उमेश हे नायजेरियात एका खासगी कंपनीत व्यवस्थापक असून आई गृहिणी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आर्य मोबाइल गेमच्या आहारी गेला होता. स्वत:ला बेडरूममध्ये कोंडून घेऊन तो तास न तास मोबाईल गेम खेळायचा. त्यातून ही घटना घडली.