येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहराला पाणी पुरवठा करणा-या पुरातन गंगासागर तलावाच्या चहूबाजूने १०० एकर जागेवर जुनी वृक्ष असून त्यामुळे तलावाचे संरक्षण होत होते. शहरापासून दूर अंतरावर हा तलाव असल्याने त्याचा फायदा अवैध वृक्ष करणारे घेत रात्रीच्या वेळी भल्या मोठ्या वृक्षांची कत्तल करत तोडलेल्या वृक्षांची कटींग करुन त्याची वाहतूक करीत असल्याचे चित्रण माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक सोनवणे यांनी करत याबाबत लेखी निवेदन त्यांनी नगर पालिकेला दिले आहे. वनविभागाने अवैध वाहतूकीचा गुन्हा दाखल केला आहे, मात्र अवैध कत्तलीचा गुन्हा दाखल करावा व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.