नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बसमध्ये चढतांना महिलेच्या पर्समधील रोकडसह दागिणे चोरट्यांनी हातोहात लांबविले. ही घटना ठक्कर बाजार बससस्थानकात घडली असून यात एक हजाराच्या रोकडसह सुमारे साडे ३५ हजाराच्या अलंकारावर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजया जितेंद्र वारे (४१ रा.इंदिरागांधी पुतळय़ा जवळ,नारायण बापूनगर जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. विजया वारे या गेल्या शुक्रवारी (दि.२६) बाहेरगावी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात आल्या होत्या. गर्दीची संधी साधून चोरट्यांनी बसमध्ये चढतांना वारे यांच्या पर्समधील रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३५ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.