नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पती पत्नीतील वाद मिटविण्यासाठी आलेल्या पतीसह सासरच्या मंडळीस मारहाण करण्यात आल्याची घटना शरणपूररोड येथील महिला सुरक्षा विशेष शाखेच्या आवारात घडली. या घटनेत पतीस दगड फेकून मारण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात पत्नीसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार निशा कु-हे ,रविद्र ढवण व संगिता ढवण अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत स्वप्निल रमेश कु-हे (रा. गारखेडा छत्रपती संभाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कु-हे दांम्पत्यात कौटूंबिक वाद आहे. हा वाद महिला सुरक्षा शाखेत पोहचल्याने समझोता घडविण्यासाठी पती पत्नीस गुरूवारी (दि.२५) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
दुपारच्या सुमारास संभाजीनगर येथून स्वप्नील कु-हे हे आपल्या आई वडिलांना सोबत घेवून सुनावणीस आले असता ही घटना घडली. आवारात स्वप्निल यांच्या पत्नी निशा कुºहे यांनी त्यांना दगड फेकून मारल्याने हा वाद झाला. संशयितांनी कु-हे कुटूंबियास शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. या घटनेत स्वप्निल यांच्या डोक्यास दगड फेकून मारण्यात आल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास पोलीस नाईक शेवरे करीत आहेत.