नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये वाराणसी येथे टीबी मुक्त भारत या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या संकल्पनेनुसार टीबी मुक्त गाव हे अभियान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि जिल्हा क्षयरोग विभाग यांनी एकत्रितपणे नाशिक जिल्ह्यामध्ये राबविले.
या टी.बी. मुक्त पंचायत अभियानात समाजामध्ये क्षयरोगाच्या आजाराविषयी गंभीरपणे जनजागृती व्हावी व आपला भारत देश आपला महाराष्ट्र आणि आपला नाशिक जिल्हा टीबी मुक्त व्हावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून नियमितपणे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येतो जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या वर्षात २०२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात टीबी .मुक्त गाव, माझी जबाबदारी या संकल्पनेतून १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत टी.बी. मुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात आले. यात १४९ ग्रामपंचायतीनी क्षयरोग मुक्त होण्याचा मान मिळवला आहे.
टी .बी .मुक्त ग्राम पंचायत संख्या
१ चांदवड ११
२ देवळा ४
३ दिंडोरी ३५
४ ईगतपुरी ५
५ कळवण् १४
६ मालेगाव ११
७ नांदगाव ८
८ नाशिक ६
९ निफाड ८
१० पेठ १
११ सटाणा ४
१२ सिन्नर ३
१३ सुरगाणा ७
१४ त्रंबकेश्वर ११
१५ येवला २१
अभियानात सहभागी व्हावे
चालू वर्षात मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीनी टी.बी. मुक्त पंचायत अभियानात सहभागी होऊन टी.बी. मुक्त होण्यासाठी पुढे यावे. क्षयरोग दुरीकरणसाठी सामुहिक प्रयत्न करावेत, आरोग्य विभागाने क्षयरोग निदान व उपचारासाठी आवश्यक प्रचार व प्रसिद्धी तसेच क्षयरुग्णांसाठी फुड बास्केट या तीन मुलभूत संकल्पनावर मोठ्या प्रमाणावर काम करावे असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी यांनी केले आहे