उरण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -उरण मधील तरुणी यशश्री शिंदे तिच्या हत्येप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. उरण मध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून सेवाभावी संस्था सामाजिक संस्था महिला संघटना राजकीय पक्ष सगळेच निषेधार्थ मोर्चा काढत आहेत. आरोपीला तात्काळ अटक व्हावी व त्याला फाशीची शिक्षा करण्यात यावी ही मागणी सर्व स्तरातूनच केली जात आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याप्रकरणी उरण मध्ये आले होते, त्यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली यावेळी अत्यंत दुर्दैवी पद्धतीने यशश्री शिंदे हीच हत्या झाली आहे. जनतेची मागणीच असते की आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी मात्र आपल्याला कायद्याच्या चौकटीतच राहून आरोपींना शिक्षा द्यावी लागणार. ही घटना पाहता आरोपी पीडितेला मारण्यासाठी उरणमध्ये आला असावा. पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करत आहे मात्र अजूनही आरोपी पकडला गेला नाही हे ही सत्य आहे,मात्र अजून पोलिसांवर विश्वास ठेवून त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, आरोपीला पकडण्यासाठी फार वेळ लागणार नाही पोलीस येत्या २४ ते ४८ तासात आरोपीला पकडू शकतात.
आरोपी भारताबाहेर जाऊ शकत नाही तो भारतातच असणार आणि तो लवकर पकडला ही जाईल असेही अंबादास दानवे म्हणाले त्याचबरोबर मी इथे पीडीपीच्या कुटुंबीयांना भेटायला आलो आहे,राजकारणांवर बोलायला नाही असे खडे बोलही त्यांनी पत्रकारांना सुनावले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कुटुंबियांच्या सोबत असून आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर , उपनेत्या ज्योती ठाकरे , रेखा ठाकरे, माजी आमदार जिल्हाप्रमुख मनोहर भोईर उपस्थित होते.