नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले असून त्यात अनेक जणांना गंडा घातल्याचा प्रकार समोर येत आहे. आता मुलीस आरोग्य खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकाने महिलेस साडे तीन लाखास गंडा घातला. वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही तसेच संशयिताने पैसेही परत केले नाही त्यामुळे महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल शामराव चोपडे (रा.थोरात मळा,कराड जि.सातारा) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत ज्योती गायकवाड (रा.सिम्बॉयसिस कॉलेजवळ,अंबडलिंकरोड) या महिलेने फिर्याद दिली आहे. संशयिताशी महिलेशी गेल्या वर्षी ओळख झाली होती. मॅट्रीमोनीयल डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून संशयित महिलेच्या बहिणीशी विवाहाची बोलणी करण्यासाठी नाशिकमध्ये आला होता.
यावेळी संशयिताने आरोग्य खात्यात मोठ्या ओळखी असल्याची बतावणी करीत मुलगी तनिष्का कोपरगाव हिस शासकिय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. यापोटी संशयिताने साडे तीन लाख रूपये आपले बँक खात्यात स्विकारले होते. मात्र वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही तसेच संशयिताने पैसेही परत केले नाही त्यामुळे महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.