मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माथाडी युनियन व व्यापाऱ्यांच्या बैठकीत ३० ऑगस्टपर्यंत सध्या सुरू असलेल्या पद्धतीने लेव्ही कपात करण्याच्या ठरल्याप्रमाणे मनमाड कृषी बाजार समितीमध्ये सहा दिवसांपासून ठप्प असलेले लिलाव आज पूर्ववत सुरू झाले आहे. लिलाव ठप्प असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती.
शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, ३० ऑगस्टपर्यंत व्यापारी व हमाल मापारी यात योग्य तोडगा काढणार आहे .बैठकीत नेमका काय तोडगा निघतो याकडे शेतकरी व बाजार समितिच्या सर्वच घटकांचे लक्ष लागले आहे.