इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने श्रीलंकेबरोबर सुरु असलेल्या तीन दिवसाच्या टी २० सामन्यात सलग दुसरा विजय मिळवत मालिका खिशात घातली. आजच्या सामन्यात श्रीलंकेने भारतीय संघाला विजयासाठी १६२ धावांचे आव्हान दिले होते. पण, पावसामुळे तासाभराचा खेळ वाया गेला. त्यामुळे टीम इंडियाला ८ ओव्हरमध्ये ७८ धावांचं आव्हान मिळाले. त्यानंतर भारतीय संघाने ६.३ ओव्हरमध्ये ८१ धावा करत विजय मिळवला.
भारतीय संघाने ७८ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल, कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या तिघांनी या धावा फटकेबाजी मारुन केल्या. यशस्वीने १५ बॉलमध्ये ३ चौकार आणि षटकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.
कॅप्टन सूर्याने १२ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह २६ धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पंड्या याने फिनिशिंग टच दिला. हार्दिकने अवघ्या 9 बॉलमध्ये ३ फोर आणि १ सिक्ससह नॉट आऊट २२ रन्स केल्या. ऋषभ पंत २ धावांवर नाबाद राहिला. तर शुबमन गिल याच्या जागी संधी मिळालेल्या संजू सॅमसन याला भोपळा फोडता आला नाही.