मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातून वाहणा-या गिरणा नदीला सध्या पूर आला असून या पूर पाण्यात काही तरुण जीवघेणी स्टंटबाजी करत १५ ते २० फूट उंचावरुन नदीपात्रात पोहण्यासाठी उड्या मारत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मागील वर्षी याच ठिकाणी स्टंटबाजी करत असतांना स्टंटबाजाला आपला जीव गमवावा लागला होता. असे असले तरी अनेक उत्साही तरुण पूर पाहण्यासाठी येथे येत असल्याने पोलिस प्रशासन, महापालिकेने अशा स्टंटबाजी करणा-यांना वेळीच आवर घालण्याची मागणी करण्यात येत आहे.









