नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालेगावसह सिन्नर औद्योगीक वसाहतीतून दुचाकी चोरी करणा-या चोरणा-या माग काढण्यात ग्रामिण पोलीसांना यश आले असून, वेगवेगळय़ा भागात बेड्या ठोकण्यात आलेल्या चोरट्यांकडून चोरीच्या सात मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई ग्रामिण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली.
शहा मोहम्मद जैद मोहम्मद अस्लम उर्फ जाहिद ( रा.गुलाबपार्क,मालेगाव),तबरेज आलम बदरे उर्फ बद-या (रा.जाफरनगर,मालेगाव),आकिब शेख शाफिक उर्फ सुरतीया (रा.गुलाब पार्क मालेगाव) व मेहबुब अली जाहिद अली (रा.गुलाब पार्क मालेगाव) तसेच निखील विजय वाल्हेकर (२०) संदिप संजय वाल्हेकर (२२ रा.दोघे वेल्हाळे ता.संगमनेर जि.अ.नगर) व ज्ञानेश्वर गणपत शेलुते उर्फ आरूष सोनार (२८ रा. छावणी तोफखाना बाजार,संभीजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरासह सिन्नर औद्योगीक वसाहतीत मोटारसायकल चोरीची मालिका सुरू आहे. यापार्श्वभूमिवर स्थानिक गुन्हे शाखा सतर्क झाली आहे. मालेगाव शहरात चोरटे चोरीच्या मोटारसायकल विक्रीसाठी येणार असल्याच्या माहिती वरून पथकाने शुक्रवारी (दि.२६) चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या संशयितांच्या अटकेने छावणी पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला असून त्यांच्या काही साथादीरांचा शोध सुरू आहे. या कारवाई दरम्यान दुसºया पथकाने सिन्नरमध्ये दुचाकी विक्रीसाठी आलेल्या नगर जिह्यातील दोघांसह संभाजीनगर येथील एकाच्या मुसक्या आवळल्या.
संशयितांच्या ताब्यातून तीन दुचाकी हस्तगत केल्या असून त्यांनी संगमनेर शहर,अहमदनगर एमआयडीसी व चंदननगर (पुणे) सह सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस तपासात संशयितांनी यापूर्वी चोरी जबरीचोरी,घरफोडी सारखे गंभीर गुन्हे केल्याचे पुढे आले असून त्यांच्या अटकनेने अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई अधिक्षक विक्रम देशमाने,अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर.मालेगावचे अप्पर अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे,हवालदार नवनाथ सानप,उदय पाठक,चेतन संवत्सरकर पोलीस नाईक विनोद टिळे, शरद मोगल,विश्वनाथ काकड,सुभाष चोपडा,योगेश कोळी,दत्ता माळी,देवा गोविंद,नरेंद्र कोळी तसेच तांत्रीक शाखेचे हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम, भाऊसाहेब टिळे आदींच्या पथकाने केली.