नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र ॲकवटिक अम्याचुवर असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या ४० व्या सब ज्युनिअर आणि ५० व्या ज्युनिअर जलतरण स्पर्धेचे दिनांक १९ जुलै ते २१जुलै २०२४ पुणे येथील टिळक टॅंक डेक्कन जिमखाना येथे आयोजन करण्यात आले होते. त्यात नाशिकच्या अनेक जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. त्यात १४ वयोगटातील मुलींमध्ये नाशिकच्या अदिती हेगडे तिने वैयक्तिक अजिंक्यपद पटकावले तसेच ओवी सहाने व अलोक जाधव यांनी पण उत्तम कामगिरी केली .
आदिती हेगडे हिने १५००,८००,४००,२०० व ५० मीटर फ्री स्टाइल प्रकारात सुवर्णपद पटकावले. तिची ओडीसा भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली तसेच ४ *१०० मीटर फ्री स्टाइल व २०० मीटर मिडले रिले प्रकारात निधी कोडवानी, ओवि सहाने आदिती हेगडे आणि ज्ञानेश्वरी काकड यांनी रोप्य आणि कांस्यपदक पटकावले .
गोरेगाव मुंबई येथे सी .आय .एस. सी. इ .शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये सुमेध कुलकर्णी याने १५०० मीटर फ्री स्टाइल व २००मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये सुवर्णपदक पटकावले. ओवी सहाने तिने ५० व २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये रौप्य पदक पटकावले. आत्मजा सहाने तिने २०० , १०० फ्री व २०० बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ध्रुव धामणे याची १०० मीटर फ्री स्टाइल रिले प्रकारात निवड झाली. या सर्वांचे बंगळुरू येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली.
पवई येथे झालेल्या केंद्रीय विद्यालय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये आयुषी देवधर हिचे २०० मीटर बॅक स्ट्रोक, अवंतिका बोराडे हिचे २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक व संकेत जगताप याचे ५० मीटर फ्री व ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
हे सर्व जलतरणपटू नाशिक येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर सराव करत असून त्यांना प्रशिक्षक म्हणून शंकर मादगुंडी सर आणि विकास भडांगे सर यांचे प्रशिक्षण मिळाले तसेच तरण तलावावरच्या व्यवस्थापिका श्रीमती माया जगताप मॅडमचे मोलाचे सहकार्य मिळाले. सर्व पालक वर्गांनी मुलांचे कौतुक केले.