नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी राज्य विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिवसेना शिंदे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक प्रभारी आणि विधानसभा निरिक्षक या पदांवर नियुक्ती करुन जबाबदारी दिली आहे.
विधानसभा निवडणुक प्रभारी दादासाहेब भुसे, माजी खा.हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांची तर विधानसभा निरीक्षक म्हणून आमदार किशोर दराडे, विजयआप्पा करंजकर, सुनीलभाऊ पाटील, माजी आमदार धनराज महाले, अजय बोरस्ते, फरहानभाई खान यांची वर्णी लागली आहे.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नाशिक शिवसेना महिला आघाडीतर्फे शिवसेना नाशिक जिल्हा समन्वयक अँड श्यामला हेमंत दीक्षित यांनी अभिनंदन केले आहे.