इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय महिला नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकलं आहे. तीने भारताला कांस्यपदक जिंकवून दिल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी मनु भाकरही पहिला भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. गेल्यावेळेस तिच्या पिस्तुलमध्ये बिघाड झाल्याने पदक जिंकता आले नव्हते. मात्र यावेळी तीने भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे.
मनू भाकरची ही दुसरी ऑलिम्पिक आहे. याआधी तिने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदार्पण केले होते. १० मीटर एअर पिस्तुल फेरीत तिचे पिस्तुल तुटले होते. त्यामुळे मागीलवेळी पदकापासून वंचित राहिली होती. भारताच्या २१ नेमबाज सदस्यांमध्ये मनू भाकर ही एकमेव अशी अॅथलीट आहे जी अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे.